Advertisement Advertisement

समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओचा भीषण अपघात; टायर फुटल्याने कार पलटी, एकाचा मृत्यू तर ८ जण गंभीर जखमी….

सिंदखेडराजा (बुलढाणा कव्हरेज न्युज) : समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरच्या चॅनेलजवळ भरधाव स्कॉर्पिओ कारचा भीषण अपघात झाला. कारचे पाठीमागील डाव्या बाजूचे टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावर पलटी झाली. या भीषण अपघातात अमन साहू (वय २५) या युवकाचा मृत्यू झाला असून वाहनातील इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सीजी ०८ बीसी ४४०५ क्रमांकाची स्कॉर्पिओ कार नाशिकहून नागपूरच्या दिशेने जात होती. ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजताच्या दरम्यान सिंदखेडराजा तालुक्यातील समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडॉरच्या चॅनेलजवळ अचानक कारचे मागील डाव्या बाजूचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि काही क्षणातच कार पलटी झाली.

अपघाताची तीव्रता एवढी होती की, कारमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या अमन साहू यांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत मृत्यू झाल्याची माहिती आहे.

या अपघातात तीकेस बंदे, रवी साहू, यश साहू, देवेश साहू, हेमंत विश्वकर्मा, वासू साहू, विकी साहू, किशन विश्वकर्मा आणि नवीन साहू हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!