Advertisement Advertisement

“मला तुझ्याशी काम हाय” म्हणत हात धरला अन् मक्याच्या पिकात ओढत नेलं; हिंगणाकाझीत महिलेचा विनयभंग….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): “मला तुझ्याशी काम आहे,” असे म्हणत एका ३२ वर्षीय महिलेचा हात पकडून तिला शेतातील मक्याच्या पिकात जबरदस्तीने ओढत नेल्याचा प्रकार हिंगणाकाझी, ता. मलकापूर येथे घडला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

. जाहिरात 👆

हिंगणाकाझी येथील ३२ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, १४ ऑगस्ट रोजी दुपारी साडेदोन वाजताच्या सुमारास ती गावाच्या शिवारातील गट क्रमांक ३२१ मध्ये असताना आरोपी योगेश रामचंद्र गुरचळ याने तिच्याजवळ येऊन “मला तुझ्याशी काम आहे,” असे सांगितले. त्यानंतर त्याने वाईट उद्देशाने महिलेचा उजवा हात पकडून शेताच्या बाजूला असलेल्या मक्याच्या पिकात जबरदस्तीने ओढत नेल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकारामुळे महिलेने मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपी योगेश रामचंद्र गुरचळ याच्याविरुद्ध अप. क्र. १७०/२०२६ अन्वये कलम ७४, ३२९ (३) बीएनएसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुभाष सरकटे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!