Advertisement Advertisement

फेसबुकवर बाजार समितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांबाबत आक्षेपार्ह व्हिडीओ; खामगावात गुन्हा दाखल….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : कृषी उत्पन्न बाजार समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह व बदनामीकारक व्हिडीओ प्रसारित करून शिवीगाळ तसेच धमकी दिल्याच्या आरोपावरून खामगाव शहर पोलिस ठाण्यात रोहित सुरजमल पगारिया, रा. खामगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुधाकर अर्जुन बनसोड (वय ५५, रा. हरीफैल, खामगाव) यांनी खामगाव शहर पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनुसार, ५ ऑगस्ट रोजी रोहित पगारिया याने आपल्या फेसबुक लिंकवरून एक व्हिडीओ प्रसारित केला. या व्हिडीओमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गंभीर व बदनामीकारक आरोप करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत अश्लील शिवीगाळ करण्यात आली असून, धमकीही देण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या व्हिडीओमुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, ३५६ आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल चव्हाण करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!