Advertisement Advertisement

मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते म्हणाली… २१ वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता!

जळगाव जामोद (बुलढाणा कव्हरेज न्यूज): तालुक्यातील वडशिंगी येथील २१ वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. विद्यार्थिनीचा शोध सुरू असून, तिच्याबाबत माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुही शहादेव तायडे (वय २१, रा. वडशिंगी, ता. जळगाव जामोद) ही विद्यार्थिनी २० जुलै रोजी सकाळी सुमारे ९ वाजता मैत्रिणीच्या वाढदिवसाला जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक व परिचितांकडे शोध घेतला. सर्वत्र शोध घेऊनही तिचा काहीच ठावठिकाणा लागला नसल्याने तिचे वडील शहादेव दामाजी तायडे (वय ५०) यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

बेपत्ता विद्यार्थिनीचा रंग गोरा, उंची सुमारे ५ फूट २ इंच आहे. घरातून निघताना तिच्या अंगात विटकरी रंगाचा पंजाबी ड्रेस, काळ्या रंगाची ओढणी आणि काळ्या रंगाच्या चप्पला होत्या. तिचे केस लांब असून उजव्या पायाच्या अंगठ्यावर जखमेची खूण असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या विद्यार्थिनीबाबत कोणालाही कोणतीही माहिती मिळाल्यास जळगाव जामोद पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!