मलकापूर (बुलढाणा कव्हरेज न्यूज):मलकापूर शहरातील चैतन्यवाडी (दस बंगला) परिसरातील १८ वर्षीय तरुणी घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
तक्रारदार रोहीदास गोविंद जाधव (रा. दस बंगला, चैतन्यवाडी, मलकापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी कु. प्रतीक्षा रोहीदास जाधव (वय १८ वर्षे) ही ७ जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. त्यानंतर तिचा मैत्रिणी, नातेवाईक तसेच परिसरातील नागरिकांकडे शोध घेण्यात आला. मात्र तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात कायमी मिसिंग क्र. ४९/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे.
बेपत्ता तरुणीचा रंग गोरा, केस काळे, उंची सुमारे ४ फूट ८ इंच असून, अंगात गुलाबी रंगाचा टॉप, गुलाबी रंगाचा प्लाझो, चॉकलेटी रंगाचा स्कार्फ आणि पायात साध्या चप्पल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
अशा वर्णनाची तरुणी कुठेही आढळल्यास किंवा तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास मलकापूर शहर पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.













