Advertisement Advertisement

दोघांनी साखरपुड्या पण थाटामाटात केला; मग लग्न ठरलं! पण आता हुंड्यासाठी….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): विवाह ठरल्यानंतर साखरपुडा करून काही दिवसांनी हुंड्याची मागणी करत विवाह मोडल्याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध फसवणूक व हुंडा प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा ३ जुलै रोजी नोंदविण्यात आला.

. जाहिरात 👆

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचा विवाह कपिल सिद्धार्थ धांडे याच्याशी ठरला होता. १ नोव्हेंबर २०२५ रोजी खामगाव येथील एका हॉटेलमध्ये दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी आरोपींकडून हुंड्याची मागणी करण्यात आली. फिर्यादींनी ही मागणी नाकारल्यानंतर विवाह मोडण्यात आला. त्यामुळे फिर्यादी व त्यांच्या मुलीचा विश्वासघात करून फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी कपिल सिद्धार्थ धांडे, सिद्धार्थ मनाजी धांडे, जिजाबाई सिद्धार्थ धांडे, कमला रमेश इंगळे, सुलक्षणा उर्फ सोनल विजय पानपाटील आणि सुरेश वामन तायडे यांच्याविरुद्ध फसवणूक तसेच हुंडा प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादींनी यासंदर्भात ५ मे रोजी खामगाव शहर पोलिस ठाण्यात लेखी अर्ज दिला होता. बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षकांची परवानगी मिळाल्यानंतर ३ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अंमलदार विठ्ठल चव्हाण करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!