Advertisement Advertisement

भरधाव स्विफ्टचा मोसंबेवाडीत थरार! बैलगाडीला धडक देत हातपंप फोडून थेट घरात घुसली कार….

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर–खामगाव मार्गावरील मेहकर तालुक्यातील जानेफळजवळ असलेल्या मोसंबेवाडी येथे भरधाव स्विफ्ट डिझायर कारचा भीषण अपघात झाला. १ जुलैच्या रात्री चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने प्रथम रस्त्यालगत उभी असलेल्या बैलगाडीला जोरदार धडक दिली. त्यानंतर हातपंपावर आदळून अनियंत्रित झालेली कार थेट एका घरात घुसली.

या अपघातात घराचे मोठे नुकसान झाले असून बैलगाडी आणि हातपंपाचेही नुकसान झाले आहे. मात्र, अपघातावेळी घरात किंवा परिसरात कोणीही समोर नसल्याने मोठी जीवितहानी टळली. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. भरधाव वेग आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!