Advertisement Advertisement

पायाने मैदा तुडविण्याचा व्हिडिओ व्हायरल; स्वीट मार्ट’वर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई….

जानेफळ (बुलडाणा कव्हरेज न्युज): जानेफळ येथील एका हॉटेलमध्ये समोसा, कचोरी व इतर नाश्त्याचे पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा मैदा कामगाराकडून पायाने तुडविला जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई केली. १८ जून रोजी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने ‘जय अंबे स्वीट मार्ट’ येथे धडक तपासणी करून हॉटेल व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावली आहे.

जानेफळ बसस्थानक चौकातील अमडापूर रोडवर भवाराम हिरामण प्रजापत यांच्या मालकीचे ‘जय अंबे स्वीट मार्ट’ हे हॉटेल आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी वापरला जाणारा मैदा एक कामगार टोपल्यात पायाने तुडवत असल्याचे दिसून आले. या प्रकाराची गंभीर दखल घेत अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय संजय भोपाळे यांच्या पथकाने हॉटेल तसेच मालकाच्या घरी छापा टाकून बेसन, मैदा, खाद्यतेल व इतर साहित्याची तपासणी केली. तपासणीदरम्यान विविध खाद्यपदार्थांचे नमुनेही घेण्यात आले.

हॉटेल मालकाने आपल्या जबाबात व्हिडिओतील कामगार माधाराम गोकलराम प्रजापत याला कामावरून काढून टाकल्याचे सांगितले. मात्र, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करून अन्नसुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय संजय भोपाळे यांच्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील कलम ५९(२) तसेच भारतीय न्याय संहिता कलम २७४, २७५ आणि इतर लागू कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!