Advertisement Advertisement

चिखली डी.बी. पथकाचा धडाका! अवघ्या २४ तासांत मोटारसायकल चोराला बेड्या, चोरीची गाडी जप्त….

चिखली (बुलडाणा कव्हरेज) : चिखली शहरातील बसस्थानक परिसरातून चोरीस गेलेली मोटारसायकल अवघ्या २४ तासांत शोधून काढत चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने आरोपीला अटक केली. आरोपीकडून सुमारे ४८ हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

१९ जून २०२६ रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ४ जून रोजी त्यांनी त्यांची हीरो HF डिलक्स (क्र. MH 28 BM 3913) मोटारसायकल चिखली बसस्थानकाजवळील देशी दारू गल्लीतील न्हाव्याच्या दुकानासमोर उभी केली होती. काही वेळानंतर परत आल्यावर मोटारसायकल जागेवर नसल्याचे दिसून आले. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही वाहन न मिळाल्याने अज्ञात चोरट्याविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४२/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक अमोल गवई यांच्याकडे सोपविण्यात आला.

पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. आरोपी मेहकर येथील असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचला. कोलारा फाट्याजवळ वाहन तपासणी सुरू असताना विनाक्रमांकाची मोटारसायकल घेऊन येणाऱ्या संशयिताला अडविण्यात आले. वाहनाची कागदपत्रे मागितल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. चेसिस व इंजिन क्रमांकाची पडताळणी केली असता ते चोरीस गेलेले वाहन असल्याचे स्पष्ट झाले.

ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने आपले नाव वसीमखान बब्बुखान (वय ३५, रा. पैनगंगा नगर, मेहकर) असे सांगितले. चौकशीत त्याने ४ जून रोजी चिखली बसस्थानकाजवळील देशी दारू गल्लीतून ही मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीसह चोरीची मोटारसायकल पोलिसांनी जप्त करून पुढील तपासासाठी पोलीस ठाण्यात आणले. पुढील तपास पोलीस नाईक अमोल गवई व पोलीस कॉन्स्टेबल अजय इटावा करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकातील पोलीस नाईक अमोल गवई, पोलीस कॉन्स्टेबल निलेश सावळे, अजय इटावा, राहुल पायघन, प्रशांत धंदर, महिला पोलीस कॉन्स्टेबल रुपाली उगले व चिखली पोलीस स्टेशनच्या पथकाने पार पाडली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!