मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): मलकापूर तालुक्यातील बेलाड गावात अल्पवयीन मुलीची फसवणूक करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात २६ वर्षीय युवकाविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, पीडित मुलगी ही १७ वर्षांची असून आरोपीने तिच्याशी ओळख वाढवत प्रेमाचे आमिष दाखवले. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. काही महिन्यांपासून सुरू असलेला हा प्रकार मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर समोर आला.
तिच्याशी ओळख वाढवत प्रेमाचे आमिष दाखवले. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. काही महिन्यांपासून सुरू असलेला हा प्रकार मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर समोर आला.
पीडितेला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी बुलढाणा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
पीडितेच्या जबाबाच्या आधारे मलकापूर शहर पोलिसांनी आरोपी विशाल (रा. बेलाड) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक झेंडगे करीत आहेत…












