Advertisement Advertisement

अध्यक्ष एकनाथराव परिहार यांच्या वाढदिवसानिमित्त स्वप्नपूर्ती स्कूलमध्ये मोफत दंतचिकित्सा शिबीर; विद्यार्थ्यांना साहित्य वाटप….

अंचरवाडी (बुलडाणा कव्हरेज न्युज): परिसरात गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त आणि संस्कारासाठी ओळख असलेल्या स्वप्नपूर्ती स्कूल अँड ज्यु. कॉलेज, अंचरवाडी येथे संस्थापक अध्यक्ष एकनाथराव बाबा परिहार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मोफत दंतचिकित्सा शिबीर, विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, दातांची निगा आणि आरोग्यदायी सवयींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच टुथपेस्ट, माऊथफ्रेशनर, पेन, पेन्सिल आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.

शिबिरात डाॅ. विष्णु जाधव (अष्टविनायक डेंटल क्लिनिक, चिखली) आणि डाॅ. संदीप परिहार (रेणुकामाता डेंटल क्लिनिक, चिखली) यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून आवश्यक उपचार व औषधांचे वाटप केले.

या दंतचिकित्सा शिबिराचे उद्घाटन सौ. कोकिळाताई परिहार (सरपंच, ग्रामपंचायत अंचरवाडी) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी शाळा सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत असल्याचे सांगून कौतुक केले.

यावेळी यावर्षी पुष्कर भुतेकर हा विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पात्र ठरल्याबद्दल त्याचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तालुक्यातील खाजगी शाळांमधून स्वप्नपूर्ती स्कूलचा एकमेव विद्यार्थी निवड झाल्याने संस्थेच्या गुणवत्तेचा गौरव झाल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

कार्यक्रमाला समाधान पाटील परिहार (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली), संस्थेचे सचिव समाधान परिहार, कोषाध्यक्ष रविंद्र परिहार यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी संस्थापक अध्यक्षांना स्वतः तयार केलेले ग्रीटिंग कार्ड देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन प्राचार्या, शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी केले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!