Advertisement Advertisement

रोही आडवा आल्याने अपघात; फार्मसीचे दोन विद्यार्थी गंभीर

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : साखरखेर्डा येथील फार्मसी कॉलेजकडे दुचाकीने येत असताना अचानक रस्त्यावर धावत रोही आडवा आल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात रोही जागीच ठार झाला, तर दुचाकीवरील दोन फार्मसीचे विद्यार्थी गंभीर जखमी झाले. ही घटना साखरखेर्डा–मेहकर मार्गावर ८ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास घडली.


मेहकर तालुक्यातील अनिकेत चव्हाण (वय २२) व दीपक साळवे (वय २१) हे दोघे साखरखेर्डा येथील फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून ते दुचाकीने कॉलेजकडे जात होते. साखरखेर्डा–मेहकर रस्त्यावर सुखदेव जैवळ यांच्या शेताजवळ अचानक रस्त्यावर धावत आलेल्या रोहीला दुचाकीची जोरदार धडक बसली. धडकेचा जोर इतका होता की रोही जागीच ठार झाला.


अपघातात अनिकेत व दीपक हे दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चिखली येथे हलविण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!