चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली नगर परिषद नगराध्यक्षपदाची निवडणूक आता फार मोठ्या राजकीय महत्वाची बनली आहे. या निवडणुकीत स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होत असल्याने भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरत आहे.
भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडितराव देशमुख हे स्वच्छ प्रतिमा, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि शांत स्वभावामुळे मतदारांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यांच्या प्रचाराला बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २५ नोव्हेंबर रोजी चिखलीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या सभेची जोरदार चर्चा शहरात आहे. संपूर्ण चिखलीचे वातावरण भाजपमय झाले असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. दुसरीकडे विरोधकांचा प्रचार मात्र गती गमावताना दिसत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस नेहमीच विकास आणि पारदर्शक प्रशासनावर भर देतात. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीचा अर्थ चिखलीकरांना स्पष्ट संदेश देतो पंडितराव देशमुख यांच्या नेतृत्वात चिखलीला स्वच्छ, सुरक्षित आणि विकासकेंद्रित दिशा मिळणार आहे.
हेही निश्चित मानले जात आहे की, २५ नोव्हेंबरची ही सभा भाजपच्या विजयासाठी ‘अंतिम बुस्टर डोस’ ठरणार असून जनमताचे मोठे प्रदर्शन होण्याची चिन्हे आहेत. पंडितराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चिखलीत ‘परिवर्तन पर्व’ सुरू होणार, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांत दिसून येत आहे.















