मेरा खुर्द (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील मेरा चौकी परिसरात भरदिवसा एका युवकाचा मर्डर झाल्याची घटना आज दुपारी अडीच वाजता उघडकीस आली आहे. ही घटना अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून, मर्डर कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.



घटनास्थळी पोलीस ताफा पोहोचला असून, सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून, घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली आहे.
संतापजनक…! अकरा वर्षीय चिमुकलीवर अल्पवयीन नरधमाने केला अत्याचार! धाड पोलीस स्टेशन हद्दीतील घटना…
सध्या पोलिसांकडून खालील बाबींची चौकशी सुरू आहे: संबंधित व्यक्ती तिथे कशासाठी आला होता? त्याचा इतर कुणाशी वाद होता का? ही घटना घडली त्यावेळी आजूबाजूला कोण होते?
अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत यापूर्वीही अवैध रेती वाहतूक, गैरकायद्याचे धंदे अशा घटनांमुळे सतत चर्चा होत असते. त्यामुळेच ही घटना अधिक गांभीर्याने घेतली जात आहे.
अधिकृत माहिती आणि मर्डरचे नेमके कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
1 thought on “BIG BREAKING: चिखली तालुक्यातील मेरा चौकी येथे भरदिवसा युवकाचा मर्डर? अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना…”