वैजापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) – वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे शेतात काम करत असलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (७ जून) दुपारी चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी शिऊर पोलिसांनी ४० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला शेतात एकटीच काम करत होती. यावेळी पांडुरंग मुरलीधर कोकाटे (वय ४०, रा. लोणी खुर्द) हा इसम तेथे येऊन महिलेच्या इच्छेविरुद्ध तिचा हात पकडून मिठीत मारण्याचा प्रयत्न करू लागला आणि अश्लील चाळे केले.महिलेने घाबरून आरडाओरड सुरू केली असता, कोकाटेने तिच्यावर मारहाण केली. मात्र, महिलेने धैर्य दाखवत जोरदार प्रतिकार केला आणि त्यानंतर कोकाटे घटनास्थळावरून पळून गेला.
याप्रकरणी महिलेने शिऊर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर कोकाटेविरुद्ध विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार विजय भिल्ल करत आहेत.
1 thought on “शेतात काम करत असलेल्या महिलेला मागुन येऊन मारली मिठी; लोणी खुर्द येथील घटना…”