Advertisement Advertisement

पहाटेच्या अंधारात भरधाव वाहनानं दुचाकीला मागून उडवलं! सुनील इंगळेंचा जागीच मृत्यू; खामगाव-नांदुरा रस्त्यावर काळाचा घाला!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : खामगाव-नांदुरा मार्गावर पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तेजराव पवार यांच्या शेताजवळ भरधाव वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. सुनील दशरथ इंगळे (वय ४२, रा. उटी खुर्द, ता. जळगाव जामोद) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना १५ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ४ ते ६ वाजताच्या दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील इंगळे हे एमएच-२८-बीबी-००४१ क्रमांकाच्या वाहनाने जात होते. दरम्यान, खामगाव ते नांदुरा मार्गावर तेजराव पवार यांच्या शेताजवळ एमएच-३७-टी-०५०० क्रमांकाच्या वाहनचालकाने भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत सुनील इंगळे गंभीर जखमी झाले. मात्र, या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी किशोर दशरथ इंगळे यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून वाहनचालक शंकरलाल बारेलाल गोंड (वय २८, रा. खापा गौरी रोड, पोस्ट शहाजपुरी, ता. जि. जबलपूर, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब), १०६ (१) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटे पुढील तपास करीत आहेत. या अपघातामुळे उटी खुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!