Advertisement Advertisement

सात दिवसांपासून पिच्छा, रात्री हात पकडला! जळगाव जामोदात विवाहितेच्या विनयभंगाची तक्रार! जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल!

जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील एका परिसरात २५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमोल लक्ष्मण ढगे याच्याविरुद्ध जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २३ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, आरोपी मागील सात दिवसांपासून संबंधित विवाहितेचा पाठलाग करीत असल्याचा आरोप आहे. २३ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास आरोपीने महिलेचा हात पकडल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. तसेच या प्रकरणात जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या घटनेनंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार, २४ ऑक्टोबर रोजी अमोल लक्ष्मण ढगे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!