Advertisement Advertisement

नंबर मागितला, नकार मिळाला; पोरीचा हात धरून जवळ ओढलं! घरासमोर बकऱ्या राखणाऱ्या १७ वर्षीय मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; अंढेरा पोलिसांत पोक्सोचा गुन्हा!

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात धरून तिला जवळ ओढत विनयभंग केल्याची घटना १२ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. मुलीने मोबाईल क्रमांक घेण्यास नकार दिल्याने आरोपीने हे कृत्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी प्रदीप सर्जेराव निकाळजे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास संबंधित अल्पवयीन मुलगी घरासमोर बकऱ्या सांभाळत होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ आला आणि तिला आपला मोबाईल क्रमांक घेण्यास सांगितले. मात्र, मुलीने नकार दिल्यानंतर आरोपीने वाईट उद्देशाने तिचा हात धरून तिला जवळ ओढल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारानंतर मुलगी घरात गेली असता आरोपी तिच्या मागे घरीही आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्याने मोबाईल क्रमांक तेथे ठेवून तो घेऊन जाण्यास सांगितले. मात्र, मुलीने पुन्हा नकार देत घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला.

अंढेरा पोलिसांत गुन्हा दाखल….

मुलीच्या आई-वडिलांनी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी १२ ऑक्टोबर रोजी प्रदीप सर्जेराव निकाळजे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ व ७८ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल केला. ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश घुगे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!