Advertisement Advertisement

सातपुड्यात अस्वलाचा धुमाकूळ! शेतात गेलेल्या १३ वर्षीय मुलीवर भरदिवसा हल्ला! भिंगारा बीट दोनमधील घटना; गंभीर जखमी मुलीला अकोला येथे उपचारासाठी हलविले….

आसलगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): जळगाव जामोद तालुक्यातील डोंगराळ सातपुडा भागातील अतिदुर्गम भिंगारा परिसरात अस्वलाने एका १३ वर्षीय मुलीवर भरदिवसा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. भिंगारा बीट क्रमांक दोनमध्ये शेत परिसरात ही घटना घडली असून, या हल्ल्यात गायत्री भाईलाल डावर ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री दुपारच्या सुमारास शेत परिसरात गेली होती. त्यावेळी अचानक अस्वलाने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या. दरम्यान, बराच वेळ मुलगी दिसून न आल्याने तिचा शेत परिसरात शोध घेण्यात आला. त्यावेळी ती गंभीर जखमी अवस्थेत बेशुद्ध पडलेली आढळून आली.

घटनेची माहिती मिळताच रुक्मिणी अध्यक्ष फाउंडेशनचे संजय खंडेराव, माजी सरपंच सरदार यांच्यासह गावातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी गायत्रीला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे भिंगारा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अस्वलाचा वावर असलेल्या भागात वन विभागाने तातडीने गस्त वाढवावी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. विशेषतः शेतात जाणाऱ्या शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!