शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): चॉकलेट देण्याच्या बहाण्याने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला जवळ बोलावून तिचा विनयभंग केल्याची घटना १२ सप्टेंबर रोजी सकाळी शेगाव शहरात घडली. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी एका वृद्धाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास आरोपीने अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने जवळ बोलावले. त्यानंतर तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.
घडलेल्या प्रकाराची माहिती पीडित मुलीने आपल्या कुटुंबीयांना दिल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांकडे धाव घेतली. पीडितेच्या तोंडी रिपोर्टवरून शेगाव शहर पोलिसांनी रामकृष्ण दास (रा. शेगाव) यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास शेगाव शहर पोलीस करीत आहेत.











