Advertisement Advertisement

देऊळगाव महीतील २४ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोमवारी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मृत तरुणाचे नाव सचिन रंगनाथ शिंगणे (वय २४, रा. देऊळगाव मही, ता. देऊळगाव राजा) असे आहे. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी देऊळगाव राजा पोलिस पुढील तपास करत आहेत. तरुणाच्या अकाली निधनामुळे गावात शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!