Advertisement Advertisement

रस्ता विचारायला थांबविलं, आशीर्वादाच्या नावाखाली खिशावरच डल्ला!डोक्यावर हात ठेवताच १० हजार १०० रुपये गायब; डोणगावजवळ भामट्यांचा नवा फंडा!

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): रस्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ बोलावलं अन् आशीर्वाद देण्याच्या नावाखाली खिशातील पैसेच लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार डोणगाव परिसरात उघडकीस आला आहे. छत्रपती संभाजीनगरचा रस्ता विचारणाऱ्या कारमधील दोघांपैकी एका व्यक्तीने दुचाकीस्वाराच्या खिशातून तब्बल १० हजार १०० रुपये काढून घेतल्याची तक्रार डोणगाव पोलिसांत करण्यात आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नेतंसा येथील राजू मिठूलाल ओसवाल हे दुचाकीने डोणगावकडे जात असताना बुलढाणा-वाशिम जिल्ह्यांच्या सीमेलगत असलेल्या मदरशाजवळ सकाळी १० ते ११ वाजेच्या सुमारास थांबले होते. याचवेळी मागून आलेली काळ्या रंगाची कार त्यांच्या जवळ येऊन थांबली. कारमधील दोघांनी ओसवाल यांना छत्रपती संभाजीनगरला जाण्याचा रस्ता विचारला.

रस्ता सांगण्यासाठी ओसवाल कारजवळ गेले असता, कारमधील अंगाला भस्म लावलेल्या आणि भगवी पगडी घातलेल्या व्यक्तीने त्यांना आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने डोक्यावर हात ठेवला. याच संधीचा फायदा घेत त्यांच्या खिशातील १० हजार १०० रुपये काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

रस्ता विचारण्याच्या साध्या बहाण्यातून अशा प्रकारे पैसे लंपास झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी राजू ओसवाल यांनी डोणगाव पोलिसांकडे तक्रार दिली असून, पोलिसांकडून पुढील तपास केला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!