शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील टिपू सुलतान चौक परिसरात राहणाऱ्या २१ वर्षीय विवाहितेचा नोव्हेंबर २०२५ मध्ये विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी १६ जानेवारी रोजी आरोपी मंजूर शाह हैदर शाह याच्यासह पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने वाईट उद्देशाने तिचा हात धरून नको ते कृत्य करत विनयभंग केला. विरोध केल्यावर कोणाला काही सांगितले तर नवरा व मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार असह्य झाल्याने पीडितेने पतीला घडलेली घटना सांगितली असता, पतीनेही तिची बाजू न घेता शिवीगाळ व मारहाण करत तिला गप्प राहण्याची धमकी दिली.
या प्रकरणी पीडितेच्या तोंडी रिपोर्टवरून दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम ७४, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शेगाव शहर पोलीस करीत आहेत.














