Advertisement Advertisement

मोबाईल दिला प्रेमात, पोरगी गेली पोरासोबत हवेत..! चिखली तालुक्यातील घटना…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी अमडापूर पोलीस ठाणे येथे संबंधित युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी दहावी नापास झाल्यानंतर घरीच राहत होती. कुटुंबीय शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी चिखली तालुक्यातील एका गावातील एका मुलाने त्याच्या बहिणीमार्फत मुलीला मोबाईल दिला होता. त्यानंतर दोघांमध्ये संपर्क वाढल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, २६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मुलगी घरातून बाहेर पडली; मात्र बराच वेळ उलटूनही ती परत आली नाही. कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता, नातेवाईकांकडून माहिती मिळाली की, आकाश वानखेडे याने मुलीला मोटारसायकलवर बसवून नेले. या तक्रारीवरून पोलिसांनी युवकाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!