Advertisement Advertisement

देऊळगाव राजात किरकोळ वाद विकोपाला; तरुणाच्या अंगठ्याला चावा घेत गंभीर दुखापत….

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील पांग्री सिंगाव येथे किरकोळ वादातून एका तरुणाला मारहाण करून त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला चावा घेत गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत तुकाराम बोरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायण संजय धायडे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.ही घटना २५ जुलै रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास पांग्री सिंगाव येथील भैरवनाथ महाराज मंदिर परिसरात घडली. फिर्यादी भागवत बोरकर हे दर्शनासाठी मंदिराकडे जात असताना आरोपीने त्यांना शिवीगाळ केली.

याबाबत जाब विचारल्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला चावा घेत गंभीर दुखापत केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.घटनेनंतर जखमी भागवत बोरकर यांनी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीवरून आरोपी नारायण संजय धायडे याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!