Advertisement Advertisement

इसरुळ शिवारात बिबट्या आला पण शिकार करून गेला…! सरपंच सतीश भुतेकर म्हणतात…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली तालुक्यातील इसरुळ शिवारात बिबट्याने वासरावर हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ३१ मार्च रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.

जाहिरात 👆

मिळालेल्या माहितीनुसार, शेतात चरण्यासाठी सोडण्यात आलेल्या गायीच्या वासरावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाला. सकाळी शेतकऱ्यांना हा प्रकार लक्षात येताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. बिबट्याच्या हालचालींचे ठसे आढळून आले असून परिसरात त्याचा वावर वाढल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच पशुधनाच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचीही मागणी पुढे येत आहे.

वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, रात्रीच्या वेळी एकटे बाहेर न जाण्याचा सल्ला दिला आहे.

सरपंचांची मागणी बिबट्याला तात्काळ जेरबंद करा…

सरपंच सतीश भुतेकर यांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे. तसेच पीडित शेतकऱ्याला त्वरित आर्थिक मदत देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!