Advertisement Advertisement

चेक बाउन्स प्रकरणात शिक्षकाला जेल! न्यायालयाचा कडक निर्णय…!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): धनादेश अनादर (चेक बाउन्स) प्रकरणात न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत थेट सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्याने एकच खळबळ उडाली आहे.बुलढाणा येथील रहिवासी संदीप अच्युतराव गवई यांनी आरोपी नरेंद्रसिंग रामसिंग राजपूत (रा. जानोरी ता. शेगाव), व्यवसायाने शिक्षक, यांना एक लाख सत्तर हजार रुपये उसने दिले होते. मात्र, ठरलेल्या मुदतीत आरोपीने रक्कम परत केली नाही. वारंवार मागणी करूनही पैसे न मिळाल्याने अखेर आरोपीने फिर्यादीस १.७० लाख रुपयांचा धनादेश दिला.

परंतु संबंधित धनादेश बँकेत सादर केला असता तो अनादरित (बाउन्स) झाला. त्यामुळे फिर्यादीने अॅड. गुणवंत नाटेकर यांच्या मार्फत न्यायालयात तक्रार दाखल केली. या प्रकरणी न्यायालयात सखोल सुनावणी पार पडली.

सुनावणीअंती अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ च्या कलम १३८ अंतर्गत आरोपी नरेंद्रसिंग राजपूत यास दोषी ठरवले. त्यानुसार न्यायालयाने आरोपीस ३ महिन्यांचा सश्रम कारावास तसेच २ लाख ८० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आणखी १ महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ही शिक्षा फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ च्या कलम २५५(२) तसेच परक्राम्य संलेख अधिनियमाच्या कलम १४३ अन्वये देण्यात आली आहे.या प्रकरणात अॅड. गुणवंत नाटेकर यांनी फिर्यादीची बाजू प्रभावीपणे मांडली. दरम्यान, न्यायालयाने आर्थिक व्यवहार करताना कायदेशीर जबाबदारीचे भान ठेवण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!