Advertisement Advertisement

फोन करून चौकात बोलावलं अन् तलवारीनं केला हल्ला; बुलडाण्यात तिघांवर गुन्हा..

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलडाणा शहरातील इंदिरानगर भागात धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील रहिवासी नजमोद दीन खाँ मोले खाँ यांना २८ फेब्रुवारी रोजी सलमान खाँ याने फोन करून मशिदीसमोरील चौकात बोलावले. नजमोद दीन खाँ तेथे पोहोचताच इब्राहिम खाँ याने त्यांचे हात पकडले तर कादर खाँ याने त्यांची गच्ची धरून ठेवली.


याचवेळी सलमान खाँ याने हातातील तलवारीने नजमोद दीन खाँ यांच्या पाठीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.


दरम्यान, पतीला वाचवण्यासाठी शमिना बी मध्यस्थी करण्यासाठी धावून आल्या. मात्र आरोपींनी त्यांच्यावरही हल्ला केल्याची माहिती आहे. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात सलमान खाँ, इब्राहिम खाँ आणि कादर खाँ यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!