Advertisement Advertisement

बुलढाणा येथे २७ व २८ डिसेंबरला लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन एकूण १४ सत्रांमध्ये सांस्कृतिक, वैचारिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम उत्तम कांबळेंच्या हस्ते उद्घाटन तर विलास सिंदगीकर संमेलनाध्यक्ष साहित्य संमेलनात नागरिकांनी सहभागी व्हावे – रविकांत तुपकर

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज): राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने येथील लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानच्यावतीने २७ व २८ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी, गर्दे वाचनालयाच्या सभागृहात दोन दिवसीय लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.‌
एकूण १४ सत्रे असणाऱ्या व विविध सांस्कृतिक वैचारिक तथा प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणाऱ्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते होणार असून सुप्रसिद्ध कथाकार विलास सिंदगीकर हे संमेलनाध्यक्ष असणार आहेत. उद्घाटन सत्रात आ. संजय गायकवाड, आ. सिध्दार्थ खरात, साहित्य संस्कृती मंडळाचे डॉ. आशुतोष पाटील, डॉ. प्रकाश होळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तर जिपचे मुकाअ गुलाबराव खरात, प्रा. डॉ. सदानंद देशमुख, रमेश इंगळे उत्रादकर, प्राचार्य गोविंद गायकी, डॉ. सुकेश झंवर, अमोल हिरोळे, दिलीप जाधव यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. संविधान सन्मान रॅली, ग्रंथ प्रदर्शनी, तसेच मराठी भाषा संवर्धन,वाचन चळवळ व युवक आणि भारतीय संविधानाची ७५ वर्षे व वर्तमान समाज, अभिजात मराठी भाषा व वामनदादा कर्डक यांच्या लेखणीतील जीवनमूल्ये या तीन महत्वाच्या विषयावरील परीसंवाद अनुक्रमे विठ्ठल कांगणे, ॲड. असिम सरोदे व प्रा.डॉ. दिलीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेत होणार आहेत. भोपाळ येथील सनदी अधिकारी व सुप्रसिद्ध साहित्यिक कैलास वानखेडे व भाषा, लिपी तज्ञ, संशोधक व नाटककार रवींद्र इंगळे चावरेकर यांची मुलाखत, शाहीर निवृत्ती तायडे व शाहीर डी. आर. इंगळे यांचा आंबेडकरी जलसा, कवी अनंत राऊत यांचा कविता परीवर्तनाच्या हा विशेष कार्यक्रम, कवी अजिम नवाज राही यांच्या अध्यक्षतेत निमंत्रितांचे कवी संमेलन, नागसेन सावदेकर, प्रा. डॉ. किशोर वाघ, सपना खरात, देवा अंभोरे, महेंद्र सवंग यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांचा ‘वामनदादा कर्डक -जनातला व मनातला’ हा विशेष कार्यक्रम , डॉ. गणेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेत निमंत्रितांचे गझल संमेलन व समारोपाला सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संमेलनाच्या समारोपाला सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यासह ओएसडी सिध्दार्थ भंडारे , चित्रकार श्रीधर अंभोरे, प्रा. मुकुंद भारसाकळे, डॉ. एस. एम. कानडजे, मुकुंदभाऊ सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
संमेलनातील सर्व सत्र समाजाला ज्ञान देणारे व प्रबोधन करणारे असल्याने सर्व साहित्यिक, विद्यार्थी व नागरीकांनी बहुसंख्येने संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर , संमेलन प्रमुख शाहीर डी. आर. इंगळे, संमेलन संयोजक सुरेश साबळे व निमंत्रक सिध्दार्थ आराख यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!