विकृती! जळक्या माणसाचे काळे कारनामे; सौ. वंदना घुबे,आणि कोमल सपकाळ यांचे शुभेच्छा बॅनर फाडले; पायाखालची जमीन सरकल्याने असले काम, वंदना घुबेंचा हल्लाबोल; कोमल म्हणाल्या, शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कल मधील जनता पाहून घेईल….

चिखली: (बुलडाणा कव्हरेज न्युज) शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कल मधील राजकारण तापले आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजपच्या सौ. वंदना घुबे आणि सौ कोमलताई सपकाळ यांनी वेगवेगळे शुभेच्छा बॅनर लावले होते. मात्र कुण्यातरी अज्ञात भामट्याने हे बॅनर फाडले आहे. या कृत्यांमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे..

दरम्यान या संदर्भात प्रतिक्रिया देतांना वंदनाताई घुबे म्हणाल्या की, विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकल्याने असले भ्याड कृत्य कुणीतरी केले आहे. ही नीच मानसिकता असल्याचे त्या म्हणाल्या.

सौ. कोमलताई सपकाळ म्हणाल्या की, “ज्यांना विचारांची लढाई लढता येत नाही ते अशा पद्धतीचे विकृत कारनामे करतात. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मुरादपूर फाट्यावर लावलेले बॅनर कुणीतरी फाडले. ज्येष्ठ नेते विष्णू घुबे यांचेही बॅनर कुणीतरी फाडले…कुणी फाडले हे देवाला माहीत, देव त्यांना माफ करणार नाहीच.. मात्र शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कल मधील मायबाप जनताही अशा विकृत मनोवृत्तीच्या माणसांना थारा देणार नाही.. बॅनर फाडल्यानंतर मी घाबरेल, निवडणुकीतून माघार घेईल असे कुणाला वाटत असेल..त्यांना मी सांगू इच्छिते, असल्या भ्याड कृत्यांना मी भीक घालत नाही.. महाराष्ट्राला लढाऊ बाणा शिकवणाऱ्या राजमाता जिजाऊंची मी लेक आहे..”

भारतीय जनता पार्टीची ताकद शेळगाव आटोळ सर्कलमध्ये असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली असल्याने असे कृत्य करून भारतीय जनता पार्टीच्या इच्छुकां मध्ये भांडण लावण्याचा इतरपक्षाच्या लोकांचा हा डाव कधीच साध्य होणार नाही.आमच्या मध्ये पक्षाने कुणालाही उमेदवारी दिली तर त्याचे काम इमानेइतबारे करण्याची भाजपाची परंपरा आहे आणि ती येथेही पाळली जाणार आहे म्हणून विरोधकांनी काड्या करणे बंद करावे. विरोधकांना समजू नये की आम्ही अलग अलग आहोत मात्र काल आज आणि उद्या आम्ही एक आहोत भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक मध्ये एक जुटीने काम करणार आहे…

सौ. मनिषा संतोष काळे , भाजपा कार्यकर्ते शेळगाव आटोळ सर्कल

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!