Advertisement Advertisement

BREAKING “अनेक आजी /माजी सरपंच आणि कार्यकर्ते आमदार संजय गायकवाडांच्या गोपनीय संपर्कात; चिखलीत राजकीय भूकंपाचा इशारा!” आमदार महाले ताईंचा मतदारसंघ ढासळतोय का? कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज वाढली!”

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली–बुलडाणा मतदारसंघात उन्हाळ्याबरोबरच राजकीय वातावरणही चांगलेच तापू लागले आहे. सध्या “ताई विरुद्ध भाऊ” अशी चर्चा रंगू लागली असून पुढील काही दिवसांत मोठे राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या चार दिवसांपूर्वी बुलडाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चिखली तालुक्यातील अनेक दिग्गज नेते आणि सरपंचांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली होती.

दरम्यान, येत्या ५ तारखेला आणखी एक मोठा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे, चिखली तालुक्यातील अनेक प्रभावशाली सरपंच आणि नेते हे सुद्धा आमदार गायकवाड यांच्या संपर्कात असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे या पक्षप्रवेशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अनेक आजी आणि माजी सरपंच हे आमदार संजय गायकवाड यांच्या संपर्कात असल्याचे सांगून अशी चर्चा सध्या चिखली शहरात सुरू झाली आहे…

या सर्व पार्श्वभूमीवर आगामी काळात नेमके कोण कोणत्या पक्षात जाणार, कोणाचा राजकीय ‘गेम’ बसणार आणि मतदारसंघातील समीकरणे कशी बदलणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

एकूणच, चिखली–बुलडाणा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला असून पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे. शेवटी… राजकारण आहे भो!

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!