अल्पवयीन मुलगी गर्भवती; तरुणाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा, अटक….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, गावातील २९ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिच्या आई-वडिलांच्या संमतीशिवाय विवाह केला. तसेच तिच्याशी संबंध ठेवल्यामुळे ती गर्भवती राहिल्याची बाब वैद्यकीय तपासणीत समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.


पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असताना आरोपीने तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर १९ जुलै २०२५ रोजी तिच्या पालकांची संमती न घेता तिच्याशी विवाह केला. विवाहानंतर मुलगी गर्भवती राहिल्याने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अकोला येथील शासकीय रुग्णालयातून प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालात मुलगी गर्भधारणेच्या वेळी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले.


तसेच, पीडित मुलीने दिलेल्या जबाबात आरोपीने अल्पवयीन असतानाच विवाह करून तिच्याशी संबंध ठेवल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४, पोक्सो कायदा कलम ४ (१) तसेच बालविवाह प्रतिबंध कायदा कलम ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रीना सदार करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!