Advertisement Advertisement

शेळगाव आटोळ ला बिबट्या आला रे बिबट्या आला; वासराची शिकार करून गेला…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील शेळगाव आटोळ परिसरात बिबट्याच्या हालचालींनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेळगाव आटोळ येथील शेतकरी सोपान शिवाजी पांगे यांच्या डोद्रा शिवारातील शेतात आज पहाटेच्या सुमारास बिबट्याने धाडसी हल्ला केला.

पांगे यांच्या शेतात जनावरांसाठी बांधलेल्या कोठ्यात जनावरे असताना बिबट्याने लहान वासरावर झडप घालत हल्ला केला आणि नंतर तेथून पसार झाला. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी धास्तावले असून रात्रीच्या वेळी जनावरांच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, मागील आठवड्यातही शेळगाव आटोळजवळील इसरुळ येथे अशाच प्रकारे एका शेतकऱ्याच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याचा बळी घेतला होता. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे बिबट्याचा वावर वाढल्याचे स्पष्ट होत आहे.

या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!