जळगाव जा (बुलडाणा कव्हरेज न्युज):- गेल्या अनेक दिवसापासुन पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सोयाबीन, कापूस,तूर,मूग,उडीद,मका यांसारखी पिके पाण्याअभावी धोक्यात आली असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे.
या मागणीसाठी तहसीलदार साहेब जळगाव (जा.) यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन, बुलढाणा जिल्ह्यात पावसा अभावी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत,पीक विम्याची नुकसानभरपाई, कर्जाबाबत दिलासा तसेच जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली.
व 30/31 जुलै रोजी जळगाव (जामोद) तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली होती त्यामुळे अनेक नदीनाल्याना मोठ्या प्रमाणात पुर आल्याने नद्यांनी प्रवाह बदलले होते तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची जनावरे वाहुन गेली, शेतीपिकाचे प्रचंड नुकसान झाले असताना अजुनही नुकसान भरपाई मिळताना दिसत नाही.
तरी शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार करता त्वरीत शेती पिकाची नुकसान भरपाई, वाहून गेलेल्या जनावरांची आर्थिक नुकसान भरपाई, नद्यांचे खोलीकरण करणे या मागणीसाठी युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे आक्रोश केला.
यावेळी अनिलसिंह राजपूत,शिवदास खिरोडकर अजय गिरी,वैभव जाणे आकाश आटोळे,भागवत वाघ,अजहर शेख,त्रिलोक सिंग राजपूत राजेंद्र राखुंडे, अशोक राखुंडे, अमोल बहादरे, सदाशिव जाणे, सय्यद भाऊ, निलेश अवसार, सागर वाघ, सागर गवई, उल्हास झाटे, सचिन झाटे, ज्ञानेश्वर अंभोरे, नारायण खंडारे, गौतम तायडे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.














