Advertisement Advertisement

रस्त्यावरून जात होता म्हातारा; क्रेननं धक्का दिला अन् दोन्ही पायाखालून गेली! बुलढाण्यात खळबळ…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा शहरातील खामगाव मार्गावर क्रेनच्या धडकेत ६० वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. दशरथ नारायण लिंगायत (वय ६०, रा. साखरखेर्डा) असे जखमी वृद्धाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ लिंगायत हे काही कामानिमित्त बुलढाणा शहरात आले होते. खामगाव मार्गावरील संत तुकाराम अर्बन बँकेजवळून ते जात असताना नाईक क्रेन सर्व्हिसची क्रेन त्यांच्या अगदी जवळून गेली. यावेळी क्रेनचा धक्का लागल्याने ते रस्त्यावर पडले.

वृद्ध रस्त्यावर पडताच क्रेन त्यांच्या दोन्ही पायांवरून गेल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित असलेले सागवनचे सरपंच देवा दांडगे यांच्यासह नागरिकांनी तातडीने अॅम्ब्युलन्स बोलावून जखमी वृद्धाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मात्र, प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर दशरथ लिंगायत यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघाताची पुढील चौकशी व कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!