Advertisement Advertisement

नांद्राकोळी शिवारात पैनगंगा नदीपात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांद्राकोळी शिवारात पैनगंगा नदीच्या पात्रात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर इसमाची अद्याप ओळख पटलेली नसून, त्याच्या नातेवाईकांनी किंवा परिचितांनी पुढे येऊन ओळख पटवावी, असे आवाहन बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नांद्राकोळी शिवारातील पैनगंगा नदीच्या पात्रात हा अनोळखी पुरुष आढळून आला. सदर इसमाचा रंग सावळा, चेहरा गोल असून डोक्यावर काळे-पांढरे मध्यम केस आहेत. तसेच त्याची काळी-पांढरी मध्यम दाढी आहे.

मृत इसमाच्या उजव्या हाताच्या मनगटावर लाल रंगाची राखी बांधलेली आहे. त्याची उंची अंदाजे पाच फूट असून बांधा मध्यम आहे. अंगात पांढऱ्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट, पांढऱ्या रंगाची बनियन आणि काळ्या रंगाची फुल पॅन्ट परिधान केलेली आहे.

पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू केली असून, मृतदेह सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथील शीतगृहात ठेवण्यात आला आहे.

या वर्णनातील व्यक्ती कोणाच्या परिचयाची किंवा नातेवाईकाची असल्यास त्यांनी तातडीने बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क :

📞 बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाणे : ०७२६२-२४१२५५

📞 पोलीस निरीक्षक रोही आशिष : ९६०७३०८२२४

📞 पोलीस उपनिरीक्षक समाधान वढणे :८७६६५३७३९२

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!