Advertisement Advertisement

मासरूळ येथील ४६ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; धाड परिसरातील घटना…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील मासरूळ येथील ४६ वर्षीय कामगार विनोद गोपीनाथ कारंजकर यांचा मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दुपारी सुमारे ३ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी धाड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

विनोद कारंजकर हे मासरूळ येथे आपल्या कुटुंबासह राहत होते. १८ ऑगस्ट रोजी त्यांच्या राहत्या घरी ही घटना घडल्याचे समोर आले. दुपारी प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच मृतकाचे भाऊ राजू गोपीनाथ कारंजकर यांनी धाड पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री शोकाकूल वातावरणात विनोद कारंजकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विनोद कारंजकर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.

ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेकाँ. देशमाने व भगवान खमाटे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. धाड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!