Advertisement Advertisement

जलंब-शेगाव रेल्वेमार्गावरील अनोळखी मृतदेहाची ओळख पटली; शेगावातील २९ वर्षीय तरुण…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): जलंब-शेगाव रेल्वेमार्गावर आढळून आलेल्या अनोळखी तरुणाच्या मृतदेहाची ओळख अखेर रेल्वे पोलिसांनी पटविली आहे. मयताचे नाव मंगेश अंबादास राजूरकर (वय २९, रा. व्यंकटेश नगर, शेगाव) असे असल्याची माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार, शनिवार २ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास जलंब-शेगाव रेल्वेमार्गावरील रेल्वे किलोमीटर क्रमांक ५४५/१९ जवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत संबंधित रेल्वेच्या लोको पायलटने रेल्वे प्रशासनाला माहिती दिल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

या घटनेप्रकरणी रेल्वे पोलीस ठाणे, शेगाव येथे मर्ग दाखल करण्यात आला. सुरुवातीला मृताची ओळख पटत नसल्याने तपासात अडचणी येत होत्या. मात्र, रेल्वे पोलिसांनी केलेल्या तपासातून मृताची ओळख मंगेश अंबादास राजूरकर अशी निश्चित झाली. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे पोलीस ठाणे, शेगाव येथील पोलीस हवालदार संजय चव्हाण करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!