Advertisement Advertisement

BIG BREAKING अखेर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; देशभरातील आंदोलनाला मोठे यश! NEET परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी वाढत्या जनआक्रोशानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा; काँग्रेससह विरोधकांकडून सरकारवर निशाणा…

नवी दिल्ली (बुलडाणा कव्हरेज न्युज): देशभरात NEET-UG परीक्षा गैरव्यवहार, पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून विद्यार्थी संघटना, विविध सामाजिक गट आणि विरोधी पक्षांकडून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत होती. अखेर वाढत्या जनदबावानंतर त्यांनी पंतप्रधानांकडे राजीनामा सादर केला.

राजीनामा जाहीर करताना धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य आणि देशाचे हित सर्वांत महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. सुरू असलेल्या वादाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होऊ नये तसेच परिस्थितीचा गैरफायदा देशविघातक शक्तींनी घेऊ नये, या भूमिकेतून आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

NEET-UG परीक्षा गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर देशभरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. दिल्लीतील जंतर-मंतर येथे अनेक दिवस आंदोलन सुरू होते. विरोधी पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत संसदेत आणि रस्त्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणात शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी सातत्याने केली जात होती.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे केंद्र सरकारसमोर आता नव्या शिक्षणमंत्र्यांची नियुक्ती आणि परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा हे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी परीक्षा प्रणालीत व्यापक बदल आणि दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याची भूमिका अनेक संघटनांनी व्यक्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!