Advertisement Advertisement

कॉलेजला शनिवार-रविवारची सुट्टी असल्याने ती घरी जाण्यासाठी हॉस्टेलमधून निघाली; मोबाईल बंद, चिखली पोलिसांत मिसिंग दाखल….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली शहरातील एका हॉस्टेलमध्ये राहणारी २२ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. कॉलेजला शनिवार-रविवारची सुट्टी असल्याने ती घरी जाण्यासाठी हॉस्टेलमधून निघाली होती. मात्र, ती घरी न पोहोचल्याने तिच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी नेहमीप्रमाणे घरी जाण्यासाठी हॉस्टेलमधून बाहेर पडली होती. बराच वेळ उलटूनही ती घरी पोहोचली नसल्याने पालकांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा मोबाईल फोन बंद लागत असल्याने कुटुंबीयांनी हॉस्टेल व परिसरात शोध घेतला. त्यावेळी ती हॉस्टेलमधून आधीच निघून गेल्याचे समोर आले.

सर्वत्र शोध घेऊनही तरुणीचा कोणताही ठावठिकाणा न लागल्याने अखेर कुटुंबीयांनी चिखली पोलीस ठाणे गाठत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी मिसिंगची नोंद करून तरुणीचा शोध सुरू केला असून विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य माध्यमांतून तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, संबंधित तरुणीबाबत कोणाला कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने चिखली पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!