Advertisement Advertisement

प्रेम, साखरपुडा अन् शेवटी विश्वासघात….! लग्नाचं आमिष, चार वर्षं संबंध… अखेर दुसऱ्याच युवतीच्या गळ्यात माळ!

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): लग्नाचे आमिष दाखवत एका महिलेसोबत साखरपुडा करून तब्बल चार वर्षे शारीरिक संबंध ठेवल्यानंतर दुसऱ्याच युवतीशी विवाह केल्याचा आरोप एका प्रतिष्ठित व्यापारी युवकावर करण्यात आला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका तक्रारदार (वय ४०, रा. चिखली रोड, पद्मावती पेट्रोल पंपाजवळ, देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून केतन पदमकुमार गिरणीवाले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला लग्नाचे आश्वासन देत तिच्यासोबत साखरपुडा केला. त्यानंतर जून २०२२ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मात्र, लग्नाचे आश्वासन पूर्ण न करता आरोपीने दुसऱ्या युवतीशी विवाह केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून २० जून रोजी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!