Advertisement Advertisement

कामावर निघाला अन् काळानं गाठलं!अज्ञात वाहनाच्या धडकेत बस मेकॅनिक ठार..धडक देऊन चालक जागेवरून फरार….

खामगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील कोलोरी शिवारातील गव्हाण फाट्यानजीक अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने बस मेकॅनिकचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला.

मृताचे नाव विजय दादाराव वानखडे (वय ३५, रा. महाळुंगी, ता. नांदुरा) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय वानखडे हे एसटी बस दुरुस्तीच्या कामासाठी घरून एमएच-२८-के-१६७४ क्रमांकाच्या दुचाकीने निघाले होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर कोलोरी शिवारातील गव्हाण फाट्यानजीक अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात विजय वानखडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच त्यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर संबंधित वाहनचालक न थांबता घटनास्थळावरून पसार झाला.

याप्रकरणी शिवाजी दादाराव वानखडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्यान्वये अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार किरण राऊत करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!