Advertisement Advertisement

रात्री घरात होती, सकाळी कुठं गेली कुणालाच ठाव नाही! २१ वर्षांच्या तरुणीच्या बेपत्ता….

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील रोहडा येथून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहडा येथील शेख इरफान शेख नजीर (वय २८) यांनी ८ जून रोजी अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. तक्रारीनुसार, ७ जून रोजी रात्री कुटुंबातील सर्व सदस्य नेहमीप्रमाणे घरात झोपले होते. रात्री उशिरा तसेच पहाटेच्या सुमारास घरातील महिलांना संबंधित तरुणी घरात दिसून आली नाही.

यानंतर कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे व परिसरात तिचा शोध घेतला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही ती आढळून आली नसल्याने अखेर अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली.

बेपत्ता तरुणीचे वर्णन असे आहे : रंग गोरा, उंची अंदाजे ४.५ फूट, केस लांब व काळे, अंगात पांढऱ्या रंगाचा टॉप व पांढऱ्या रंगाची लेगिन्स, भाषा हिंदी, कानात पिवळ्या धातूचे बारीक कापसे असून नाकावर तीळ आहे.

अशा वर्णनाची तरुणी कुठेही दिसून आल्यास अथवा तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ अंढेरा पोलीस स्टेशन किंवा ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!