Advertisement Advertisement

जिल्हा हादरला..! बुलढाण्यात २४ तासात गुन्ह्यांचा स्फोट! हाणामारी ते हत्या…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज):जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कायदा-सुव्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडालाय. किरकोळ कारणावरून सुरू झालेले वाद थेट जीवघेण्या हल्ल्यांपर्यंत पोहोचलेत. हाणामाऱ्या, धमक्या आणि खुनाच्या घटनांनी नागरिकांत भीतीचं वातावरण तयार झालंय.

खामगावात लग्नात राडा, तरुण ठार…

खामगावच्या शिवाजीनगर हद्दीत लग्नात नाचण्याच्या वादातून शोएबखान अमिनखान (२२) याची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी चाकू, फायटर, वस्तरा आणि दगडाने सपासप वार करत त्याला जागीच संपवलं. या प्रकरणी चार आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल झालेत.

जामोदला शेतकऱ्याला बेदम मारहाण…

जळगाव जामोद तालुक्यात अपशब्दांवरून दोन भावांनी ५५ वर्षीय शेतकऱ्याला दगड व हाताने मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला असून पोलीसांनी गुन्हा नोंदवलाय.

मलकापूरात चिमुकल्याला धडक….

मलकापूरात ४ वर्षांच्या अर्णवला भरधाव दुचाकीने धडक दिली. अपघातात त्याचा पाय गंभीर जखमी झाला असून चालक फरार आहे.

तामगावात पाण्यावरून भांडण…

फक्त पाणी मागितल्यामुळे मजुराला मारहाण केल्याची घटना तामगावात घडली. स्टीलच्या कड्याने मारून त्याला जखमी करण्यात आलं.

शेगावात शेजाऱ्यांचा हल्ला…

धनगर फैल भागात शेजाऱ्यांमधील वादात विटेने हल्ला करून एका व्यक्तीला जखमी करण्यात आलं.

पिंपळगाव राजात धमकी प्रकरण…

कामाचे पैसे मागितल्यामुळे ‘मारून टाकीन’ अशी धमकी देण्यात आल्याने पोलीसांत नोंद झाली आहे.

जलंबमध्ये महिलेला मारहाण

घरगुती वादाचं शूटिंग रोखल्यामुळे एका महिलेला काठीने मारहाण करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!