Advertisement Advertisement

वांग्याच्या शेतात अफूची शेती; अंढेरा पोलिसांची धडक कारवाई, साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त….

अंढेरा (अंकुश थुट्टे:बुलडाणा कव्हरेज न्युज)अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मेरा खुर्द येथे वांग्याच्या शेतीत अवैधरित्या अफूची लागवड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) पथक आणि अंढेरा पोलिसांनी २४ मार्चच्या रात्री संयुक्त कारवाई करत तब्बल ९ लाख १८ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरा खुर्द येथील कृष्णा रामहरी वाघमारे (वय २६) याने आपल्या वांग्याच्या शेतातच गुप्तपणे अफूची लागवड केली होती. याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथक व अंढेरा पोलिसांनी संयुक्त छापामारी केली.


छाप्यामध्ये वाघमारे याच्या शेतात वांग्याच्या पिकामध्ये मिसळून अफूची झाडे लावलेली आढळून आली. संबंधित अफूच्या झाडांना हिरव्या रंगाची बोंडे आलेली असून ती परिपक्व अवस्थेत असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त करत आरोपीविरुद्ध कारवाई केली.


या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!