साखरखेर्डा (सचिन खंडारे: बुलडाणा कव्हरेज न्युज) येथ आज रोजी सकाळी १० वाजता राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती, दिवंगत मधुकरराव खंडारे स्मृतीदिन आणि मा. अर्जुनराव गवई यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आला आहे.
शिक्षण, समाजकार्य, साहित्य, पत्रकारिता, कला आदी क्षेत्रातील गुणवंतांचा या सोहळ्यात सन्मान होणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार मा. सचिन खंडारे यांनी केले आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार, माजी मंत्री व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रम अनिकेत सैनिक स्कूल, शेंदुरजन रोड, साखरखेर्डा येथे होणार आहे.
या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.













