Advertisement Advertisement

चिखलीत जनतेचा आवाज स्पष्ट..! “काशिनाथ अप्पा, तुमच्या कामाची पावती आम्हीच देऊ…!”

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली शहरात सध्या निवडणुकीचा माहोल तापला आहे. प्रत्येक गल्ली–बोळात वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार नागरिकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी घराघरांत फिरताना दिसत आहेत. पण या गर्दीत एक नाव मात्र वेगळ्या प्रकारे चमकत आहे काशिनाथ बोंद्रे.

बोंद्रे यांना इतरांसारखे मोठे तांडे, मिरवणुका किंवा घराघरांत फिरण्याची गरज भासत नाही. कारण गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी केलेले सामाजिक काम, लोकांच्या सुख–दुःखात दिलेली साथ आणि साधेपणाने जगलेल्या जीवनामुळे ते आधीच प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवून बसले आहेत.

शहरातील नागरिक त्यांना भेटले की एकच वाक्य मनापासून सांगतात ..“अप्पा, प्रचाराची गरज काय? तुमच्या कामाची पावती आम्हीच अंगणात देणार!”या वाक्यामुळे चिखलीत चर्चेचा तापमान आणखी वाढले आहे.

लोकांमध्ये असा सूर ऐकू येतो की “बोंद्रे हे नेता नाहीत… ते आपल्यातलेच आहेत. त्यांनी दिलेले काम, दिलेली साथ आणि साधेपणा… हेच त्यांचे मोठे प्रचाराचं हत्यार आहे.”

काशिनाथ बोंद्रे हे स्वतःला पुढारी किंवा नेते मानत नाहीत. ते नेहमीच साध्या माणसांप्रमाणेच त्यांच्या समस्या समोर ठेवून काम करतात. त्यामुळेच आज जनता स्वतःहून त्यांच्यासाठी उभी राहिली असून शहरभर एकच चर्चा सुरू आहे “यावेळी चिखलीत बदल नाही… तर खरी सेवा करणाऱ्या अप्पांना संधी!”

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!