तीच ब्रेक अप झालं अन् तिच्या बॉय फ्रेंड च लग्न ठरलं! त्या दोघांचे जुने फोटो घेऊन त्याच्या घरी आली….

देऊळगाव महीत अज्ञात वाहनाच्या धडकेत ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) :माजी प्रेयसीला जेव्हा समजलं की तिच्या एक्स-बॉयफ्रेंडचं लग्न ठरलं आहे, तेव्हा ती संतापाने त्याच्या भावी पत्नीच्या घरीच धडकली. तिने त्या कुटुंबासमोर त्यांच्या दोघांचे फोटो दाखवत त्याचं खरं रूप उघड करण्याचा प्रयत्न केला. पण ही गोष्ट त्याला समजताच तो स्वतः, त्याची आई, बहीण आणि भावी पत्नी घेऊन तिथे पोहोचला आणि सर्वांनी मिळून माजी प्रेयसीवर हल्ला चढवला. या मारहाणीमध्ये ती गंभीर जखमी झाली आहे.


ही घटना हिमायतनगरमधील चाऊस कॉलनी येथे शनिवारी (४ ऑक्टोबर) दुपारी चारच्या सुमारास घडली.
३० वर्षीय आलिया (नाव बदलले आहे) ही मुकुंदवाडी परिसरात राहते. ती गेल्या तीन वर्षांपासून शाहरुख (नाव बदलले आहे) याच्याशी प्रेमसंबंधात होती. आलियाने लग्नाविषयी विचारल्यावर शाहरुखने नकार दिला होता. त्यामुळे तिने मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती आणि पोलिसांनी त्यावर गुन्हाही नोंदवला होता.


नंतर शाहरुखचे लग्न अलिशा (नाव बदलले आहे) हिच्यासोबत ठरल्याचं आलियाला समजलं. त्यामुळे ती त्याचं बिंग फोडण्यासाठी दोघांचे फोटो घेऊन थेट अलिशाच्या हिमायतनगर येथील घरी पोहोचली. त्या वेळी अलिशा घरी नव्हती, मात्र तिची आई होती. आलियाने त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला असता, त्यांनी तिला बाहेर थांबवले. दरम्यान, अलिशाचे वडील बाहेर आले आणि आलियाने त्यांना शाहरुखसोबतचे फोटो व गुन्ह्याची कागदपत्रे दाखवली.


इतक्यात शाहरुख, त्याची आई, बहीण आणि अलिशा तिथे आले. त्यांनी आलियाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. शाहरुखने लाकडी दांड्याने तिच्या उजव्या हातावर आणि पायावर प्रहार केला व तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी पोलिसांनी शाहरुख, त्याची आई, बहीण (सर्व रा. समतानगर) आणि अलिशा (रा. चाऊस कॉलनी, हिमायतनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार शिवाजी वाडेकर करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!