चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): गावागावात प्रेमाच्या गोष्टी नवनव्या रंगात उभ्या राहतात. पण चिखली तालुक्यातल्या एका गावात तर प्रकरण भारीच गाजतंय! एक पुरुष आणि एक महिला – दोघं दोन-तीन वर्षांपासून गुपचूप प्रेमात होते. गुपित लपवता लपवता शेवटी दोघांनी बाहेर जाऊन लग्नच केलं.
SBI e Mudra Loan Online 2025: छोट्या व्यवसायासाठी त्वरित कर्ज, व्याजदर १२.१५% पासून, असा करा अर्ज!
मात्र खरी भानगड इथं सुरू झाली. कारण बाहेरकरिन त्या महिलेचा संसार आधीपासूनच सुखा समाधानाने सुरू होता. तिला दोन लेकर ! अन् या माणसालाही दोन लेकरं होती. म्हणजे दोघांचाही संसार होऊन पडला होता.
पण या उपरही दोघांची मन जुळली आणि लपूनछपून भेटी होउ लागल्या.
मग काय? गावकऱ्यांच्या चर्चेला पेव फुटला. “अरे ह्यांचं प्रेम नव्याने उभाळलं, अन् थेट लग्न करून टाकलं! पण माहेर-घरच्यांना अजून काही कळलंच नाही. त्यामुळे नवीन घरात जायचं तर राहिलंच बाजूला…” अशी कुजबुज आता सुरू झाली आहे.
गावात जिथं बघावं तिथं फक्त या जोडीबद्दल चर्चा. कुणी म्हणे – “अरे ह्यांचा संसार तर दोन टोकांना चालला… अन् मध्ये प्रेमाची मशागत झालेलीच आहे!” कुणी हसतं, कुणी कानाखाली चिमटे काढतं, पण दोघांच्या या पराक्रमामुळे सगळं गाव टवाळकल्लोळात बुडालंय!.
आता गावातलं पुढचं प्रकरण काय होणार, कोण कुणाला सोडणार, नवा संसार खरोखर जुळणार की नाही – हे पाहायचं बाकीचं आहे. पण इतकं नक्की, की या “डबल संसार”च्या गोष्टीमुळे गावातल्या पोऱ्यापोरींपर्यंत चर्चा रंगल्या आहेत.