STATE NEWS: सुरुवातीला इंस्टाग्राम वर ओळख झाली अन् ओळख झाल्यानंतर दोघांनी सर्व काही केलं; लग्नाचा विषय आला…

त्याने तिचे ते फोटो तिला दाखवले अन् त्यानंतर कधी वावरत, तर कधी घरात.... आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): मुंबईच्या मीरा रोड परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी धाराशिव जिल्ह्यातील आंदोरा येथील २५ वर्षीय तरुण संदीप डोंगरे व त्याच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संदीप डोंगरे (वय २५, रा. आंदोरा, ता. कळंब, जि. धाराशिव) याने इन्स्टाग्रामवरून संबंधित तरुणीशी ओळख वाढवली. त्याचे आधीच लग्न झालेले असतानाही त्याने ही गोष्ट लपवून तरुणीला प्रेमाचे आमिष दाखवले व लग्नाचे आश्वासन देत तिच्यासोबत संबंध ठेवायला सुरुवात केली.तो वेळोवेळी मीरा रोड येथील तिच्या घरी येत होता, तसेच छत्रपती संभाजीनगर आणि आंदोरा येथेही तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.

संभाजीनगर येथील मुकुंदवाडी परिसरातील एका हॉटेलमध्येही त्याने संबंध ठेवले असून, या ठिकाणी त्याचे मित्र प्रवीण गायकवाड आणि जीवन वाकडे यांनी बनावट आधारकार्डच्या आधारे रूम मिळवून दिली होती.जेव्हा पीडित तरुणीने लग्नाची मागणी केली तेव्हा संदीप डोंगरेने टाळाटाळ सुरू केली. नंतर त्याने, त्याच्या आई शोभा डोंगरे आणि पत्नी कोमल डोंगरे यांच्या मदतीने तरुणीला मारहाण केली. इतकंच नव्हे तर तिच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख ३० हजार रुपयेही काढून घेतले.

या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून मीरा रोड येथील नया नगर पोलिसांनी संदीप डोंगरे, त्याचे मित्र प्रवीण गायकवाड, जीवन वाकडे तसेच आई शोभा डोंगरे आणि पत्नी कोमल डोंगरे यांच्याविरुद्ध विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!